आताशा तो जरा निराळे वागत असतो

आताशा तो जरा निराळे वागत असतो

आताशा तो जरा निराळे वागत असतो
वारच नाही, शब्दांनाही पाळत असतो

त्याचीच करा चर्चा,  सांगा  त्याचे किस्से
तसाही तोच माझ्या मनात नांदत असतो

अनेकवेळा तीच कहाणी सांगत असतो
लकब आणि आवाज जरासा बदलत असतो

गळून पडती पिकली पाने जमिनीवरती
हा तुझा चेहराही का तसा दिसत असतो?

या लोकांची सवयच अंदाज बांधण्याची
  उगीच नाही तुझे नाव मी टाळत असतो

जुन्या गोष्टी बघून काय जास्त मिळणार आहे?
सेकंडहँड गाडीचा भाव पडत असतो..
गझल: 

प्रतिसाद

मस्त...
खुप मस्त ! खुप मस्त !!
हनुमन्त

सोनाली,
आवडली. वरील ओळी खास!
जयन्ता५२

@सही...!! गझल आवडली.

त्याचीच करा चर्चा, सांगा  त्याचे किस्से
तसाही तोच माझ्या मनात नांदत असतो  (वा वा.!! खरंच शब्दबद्ध !)

या लोकांची सवयच अंदाज बांधण्याची 
उगीच नाही तुझे नाव मी टाळत असतो (मिश्किल शेर. :)

शेर आवडला...छानच.....
त्याचीच करा चर्चा,  सांगा  त्याचे किस्से
तसाही तोच माझ्या मनात नांदत असतो

या लोकांची सवयच अंदाज बांधण्याची 
उगीच नाही तुझे नाव मी टाळत असतो

गझल वाचणार्‍यांचे आणि प्रतिसाद देणार्‍या सर्वांचे आभार.

जुन्या गोष्टी बघून काय जास्त मिळणार आहे?
सेकंडहँड गाडीचा भाव पडत असतो..
जु न्या गो ष्टी ब घू न का य जा स्त मि ळ णा र आ हे?
१    २     २    २   १   २  १   २    १   २    १     १    १    २   १   २   २   = २६ मात्रा
से कं ड हँ ड गा डी चा भा व प ड त अ स तो..                      .      .
२   २   १  २  १   २   २   २    २    १   १  १   १   १   १    २  = २४ मात्रा  + १  +  १ = २६
दोन टिंबे मात्रात धरावीत का?
बाकी मी मोजत बसलो नाही.
माझ्यामते विचार चांगला आहे. पण, काव्यात्मक वाटत नाही.
कलोअ चूभूद्याघ्या

हा शेर विचार करून बदलता येत नाहीये.
जे लिहिले आहे ते वाचून काही समाधान मिळत नाहीये.. तेव्हा तो काढलेला बरा.
मात्रांबाबत त्या टिंबांच्या मात्रा धरायला हव्यात.
सोनाली