गझल

गझल

पावसाळा

काळजाला जाळतो हा पावसाळा
अन तुला कुरवाळतो हा पावसाळा

चारतकाला जा कुणी सा॑गून टाका
रोज त्याला टाळतो हा पावसाळा

वाट राधा पाहते यमूना किनारी
शब्द कोठे पाळतो हा पावसाळा

च॑द्रमोळी झोपडी ही मोडलेली
अन तिच्यावर भाळतो हा पावसाळा

जलसमाधी झोपड्या॑नाही दिली अन
ब॑गले सा॑भाळतो हा पावसाळा

- रवि केसकर

गझल: 

सल कशाचा आत कोठे खोल आहे

सल कशाचा आत कोठे खोल आहे
म्हणुन माझ्या हासण्याला ओल आहे

जर मला ना पाहिले मी अंतरंगी
तर पसारा साधनेचा फोल आहे

गझल: 

छळतो अजूनही का

पाऊस कालचा तो छळतो अजूनही का
जाळून काळजाला झरतो अजूनही का

ही रात्र चिंब ओली, आभाळ फाटलेले
मी कोरडा तरीही, उरतो अजूनही का

गझल: 

शब्दाना अडवीत गेले.

ही वाट तुझ्या स्वप्नान्ची आशेने तुडवीत गेले
अन रन्ग तुझ्या प्रीतीचे अन्गावर उडवीत गेले.

त्या कुठल्या पूजेसाठी आयुष्य उधळले मीही
ती नुसती पाषाणाची मी मूर्ती घडवीत गेले.

गझल: 

थाबं !

थाबं ! काही श्वास अजुन उरात बाकी आहेत...
थाबं ! काही भास अजुन दुरात बाकी आहेत...

जीवनाचे गीत जरिही सपंत आले असले तरिही,
ऍक! काही बोल अजुन सुरात बाकी आहेत...

उन्मळुन पडले वुक्षही सारे दुखा:च्या प्रवाहात या ,
बघ! काही मोजके लव्हाळे पुरात बाकी आहेत...

सरत आले तारकांचे राज्यही या क्षितीजावरचे ,
अजुन काही दिवे मिणमिणते घरात बाकी आहेत...

खर तर आशेनहि आस सारी सोडलेली,
थांब! काही बळ अजुन धिरात बाकी आहत...

गझल: 

काजळ

दुखा:चे अश्रु होते , अन् दुखा:चि ओजंळ होती ,
माझ्या एका हुद्याभोवती वेदनांची वर्दळ होती.

जाणिव होती जखमांची, रक्ताळलेल्या पंखाची अन् ,
एक भरारी घेण्या आधी हवेत कितीक वादळ होती.

आता त्या कळी सारख आपल्यालाहि फुलयच आहे
प्रत्येक काट्याकाट्याला खोटी आशा केवळ होती.

सरा दोष होता केवळ माझ्या हातांच्या रेषांचा,
वेड्यावाकड्या रेषां मधुन अशी असंख म्रुगजळ होती.

केवळ माझ्या स्वप्नांना रात्र द्रुष्ट लावुन गेली,
ज्यांची स्वप्ने पहिली त्यांच्या दोळ्यात मात्र काजळ होती.

गझल: 

भस्म

मिळाले घास आता मी गिळाया लागलो
तसा आगीत माझ्या मी जळाया लागलो!

गझल: 

Pages