भस्म


मिळाले घास आता मी गिळाया लागलो
तसा आगीत माझ्या मी जळाया लागलो!

मुलामा साखरेचा या जिभेला देउनी
कशी हांजी जगाची या कराया लागलो!

खरे स्वातंत्र्य माझे मी विकूनी टाकले
धन्याची चाकरी आता कराया लागलो!

गिळूनी स्वाभिमानाच्या जुन्या त्या कल्पना
अता मुर्दाड मीही वावराया लागलो!

तरी आतून आहे पेटतो ज्वालामुखी
तयामध्येच मीही भस्म व्हाया लागलो!

गझल: