काजळ

दुखा:चे अश्रु होते , अन् दुखा:चि ओजंळ होती ,
माझ्या एका हुद्याभोवती वेदनांची वर्दळ होती.


जाणिव होती  जखमांची, रक्ताळलेल्या पंखाची अन् ,
एक भरारी घेण्या आधी हवेत कितीक वादळ होती.


आता त्या कळी सारख आपल्यालाहि फुलयच आहे
प्रत्येक काट्याकाट्याला खोटी आशा केवळ होती.


सरा दोष होता केवळ माझ्या हातांच्या रेषांचा,
वेड्यावाकड्या रेषां मधुन अशी असंख म्रुगजळ होती.


केवळ माझ्या स्वप्नांना रात्र द्रुष्ट लावुन गेली,
ज्यांची स्वप्ने पहिली त्यांच्या दोळ्यात मात्र काजळ होती.

गझल: