जपून चालले.
फितूर वाट होता, मी जपून चालले,
स्मरून न्यायनिष्ठा, मी जपून चालले.
इथे खुशाल घिरट्या घालतात लांडगे,
वस्तित माणसांच्या, मी जपून चालले.
जुनाच विस्तवाशी भावबंध आठवे,
फुलून वाट येता, मी जपून चालले.
कसून शोध हा भिंतीत चार चालतो,
चिणून श्वास माझा, मी जपून चालले.
कुठेच ना दिलासा पाहिजे तसा मला,
फकीर धीर माझा, मी जपून चालले.
जळून पोर गेली, खंत ना तुला, मला,
चितेवरी कुणाच्या?, मी जपून चालले.
निरोप चांदण्याचा अन उनाड रात ही,
चुकून मोह होता, मी जपून चालले.
<<<<<<<<>>>>>>>>>
गझल:
प्रतिसाद
दशरथयादव
मंगळ, 12/05/2009 - 15:09
Permalink
चान्दणी ,
चान्दणी ,
भन्नाट..
इथे खुशाल घिरट्या घालतात लांडगे,
वस्तित माणसांच्या, मी जपून चालले.
जळून पोर गेली, खंत ना तुला, मला,
चितेवरी कुणाच्या?, मी जपून चालले.
निरोप चांदण्याचा अन उनाड रात ही,
चुकून मोह होता, मी जपून चालले.