फार आता फार झाले (सुधारीत)

फार आता फार झाले
श्वास घेणे भार झाले

पेटता वणवे तमाचे
सूर्य सारे गार झाले

सज्जना त्या जलसमाधी
घोर पापी पार झाले

पाय धरती एकदा,मग
पाच वर्षे स्वार झाले

"शांतिवार्ता सफल झाल्या"
आणि त्यांचे वार झाले!

आमचे इतिहास अंती
'पानिपतची हार' झाले!

काय गल्ली,काय दिल्ली
नागवे बाजार झाले

--------------------------------------
जयन्त्ता५२

 

 

गझल: