पाहतो श्वासात कोठे . .लागतो काही सुगावा

पाहतॊ श्वासात कोठे लागतो काही सुगावा
काल् तू होतीस ह्याचा शोधतो आहे पुरावा

अंगणापर्यंत माझ्या आसवांची रेष जाते
काय माझा चंद्र गेला ह्याच वाटेने असावा?

ही दुहेरी रीत एका माणसाला शोभते का ?
"जाउ दे ना" ही म्हणावे हात ही हाती धरावा

ती म्हणाली "माग ना रे. . . तू, मला सोडून काही"
(आरसा बघशील तेव्हा चेहरा माझा दिसावा !)

काय अंधारून आले माझीया प्राणांसभोती
भास् आहे की तुझ्या घनदाट छायेचा विसावा ?

लागलॊ जेव्हा जळाया यातना झाल्या न काही
पोसले आजन्म ज्याला , देह हा माझा नसावा

गझल: 

प्रतिसाद

प्रसन्न, फारा दिवसांनी (१५एप्रिलचे औचित्य साधून टाकलेली) आपली गझल वाचली. फार आनंद झाला. गझल फार आवडली. सुरेख आहे.


ही दुहेरी रीत एका माणसाला शोभते का ?
"जाउ दे ना" ही म्हणावे हात ही हाती धरावा
क्या बात है!  सध्या हा शेर गुणगुणतो आहे.

अप्रतिम  गझल.
सगळेच  शेर  पुन्हा  पुन्हा  वाचून  काढले.
हे  मिसरे  क्लासिक-
अंगणापर्यंत माझ्या आसवांची रेष जाते...

"जाउ दे ना" ही म्हणावे हात ही हाती धरावा..

काय अंधारून आले माझीया प्राणांसभोती...

पोसले आजन्म ज्याला , देह हा माझा नसावा ...

अंगणापर्यंत माझ्या आसवांची रेष जाते
काय माझा चंद्र गेला ह्याच वाटेने असावा?
"जाउ दे ना" ही म्हणावे हात ही हाती धरावा   - व्वा!
कलोअ चूभूद्याघ्या

एकेकाने आपल्याला आवड्लेला एकेक शेर दिला आहे!
पण तुमची तर संपूर्ण गझलच बेफाट आहे!

खूप आनंद मिळाला इतकी सुन्दर कविता वाचून!
आपण कविवर्य प्रसन्न शेंबेकर आहात! सलाम!

ऋत्विकफाटक

सुंदर गझल...
एकूण एक शेर आवडला... जसाच्या तसा...
लई भारी... 
चुभूद्याघ्या...
 ***********************
वाहत्या गर्दीत माझा चेहरा पाहू नको तू
मुखवटे आहेत तेथे, त्यात हा 'नचिकेत' नाही!!

सर्वांना धन्यवाद !
प्रसन्न शेंबेकर
 "तुझी जागण्याची अदा पाहिली
 फुले आरतीला उभी राहिली"

फार आवडली गझल!
आसवांची रेष आणि दुहेरी रीत हे शेर तर विशेष!!

अंगणापर्यंत माझ्या आसवांची रेष जाते
काय माझा चंद्र गेला ह्याच वाटेने असावा?

वा वा
दुहेरी रीत हा शेरही मस्त!

पाहतॊ श्वासात कोठे लागतो काही सुगावा
काल् तू होतीस ह्याचा शोधतो आहे पुरावा
- वा...वा... सुंदर कल्पना.
पहिली ओळ `का` अभावी अधुरी वाटत आहे.
अंगणापर्यंत माझ्या आसवांची रेष जाते
काय माझा चंद्र गेला ह्याच वाटेने असावा?
- अ प्र ति म
ही दुहेरी रीत एका माणसाला शोभते का ?
"जाउ दे ना" ही म्हणावे हात ही हाती धरावा
- छान...छान...
ती म्हणाली "माग ना रे. . . तू, मला सोडून काही"
(आरसा बघशील तेव्हा चेहरा माझा दिसावा !)
- वा...
काय अंधारून आले माझीया प्राणांसभोती
भास आहे की तुझ्या घनदाट छायेचा विसावा ?
- उत्तम.
माझिया हवे.
एकूण, उत्तम, सुरेख गझल.
पुढील गझललेखनाला मनापासून शुभेच्छा.

प्रदिप
बरोबर आहे. माझिया हवे, चुकून झाले आहे.

प्रसन्न शेंबेकर
 "तुझी जागण्याची अदा पाहिली

फुले आरतीला उभी राहिली"

पूर्ण गझल मस्त आहे पण त्यातही
दुहेरी रीत आणि आसवांची रेष आवडले... शेवटचा शेर पण मस्त

निखळ सुंदर!
मक्ता लाजवाब!
जयन्ता५२

निखळ सुंदर!
जयन्ता५२

छानचरे...........
ती म्हणाली "माग ना रे. . . तू, मला सोडून काही"
(आरसा बघशील तेव्हा चेहरा माझा दिसावा !)

उत्तम गझल. सुगावा - पुरावा विशेष.

सर्वांना धन्यवाद !
प्रसन्न शेंबेकर
"तुझी जागण्याची अदा पाहिली
फुले आरतीला उभी राहिली"