प्रश्न
गवसता भासला, उजवा जणू
चिकटला तोच मग, जळवा जणू
सहजता भोवती , इतकी अशी
न घडल्या कत्तली, परवा जणू
निबर ते, लाज ना, उरली मना
चघळती प्रश्नही, हलवा जणू
उसळते रक्त हे, पुरते कुठे ?
हरवला मावळा, भगवा जणू
दुखविता भावना, खपली निघे
भडकती माणसे, वणवा जणू
दहशती जागती, दिवसा तिथे
खलबते 'राम' ही, अफवा जणू
निवडले मार्ग ते, अडले असे
चुकविले चालता, 'अथवा' जणू
उजळणी मांडता, कलत्या क्षणी
उमगले जन्म हा, फसवा जणू
गझल:
प्रतिसाद
आनंदयात्री
मंगळ, 14/04/2009 - 16:13
Permalink
निवडले
निवडले मार्ग ते, अडले असे
चुकविले चालता, 'अथवा' जणू
उजळणी मांडता, कलत्या क्षणी
उमगले जन्म हा, फसवा जणू
हे आवडले...
ज्ञानेश.
गुरु, 16/04/2009 - 10:25
Permalink
छान
सहजता भोवती , इतकी अशी
न घडल्या कत्तली, परवा जणू
उजळणी मांडता, कलत्या क्षणी
उमगले जन्म हा, फसवा जणू
हे शेर चांगले वाटले. उजळणी शेरात 'चकवा' हा काफिया वापरला तर?
प्रसन्न शेंबेकर
गुरु, 16/04/2009 - 13:52
Permalink
दहशती
दहशती जागती, दिवसा तिथे
खलबते 'राम' ही, अफवा जणू
खरं आहे ! दुर्दैव आहे ह्या देशाचं !!
प्रसन्न शेंबेकर
"तुझी जागण्याची अदा पाहिली |
फुले आरतीला उभी राहिली ||"
अजय अनंत जोशी
गुरु, 16/04/2009 - 21:38
Permalink
कशाला?
चकवा कशाला?
उमगले जन्म हा, फसवा जणू - मला आवडले.
गवसता भासला, उजवा जणू
चिकटला तोच मग, जळवा जणू
..... हे ही छान आणि वास्तववादी.
कलोअ चूभूद्याघ्या