तटांसारखे..

चिरे लाव हे,.. तटांसारखे
शेर बांध अन,.. भटांसारखे!

अता सागरा, मिळून जावे,
जगावे किती,.. घटांसारखे?

रंग आपुले,..रंग विसरले?!
कसे भासती,.. छटांसारखे?

ह्वायचेय ना, तुला प्रवक्ता?
बोल बरे,.. पोपटांसारखे!

वाहतेस तू, समीप इतक्या;
तुला जाणतो,.. तटांसारखे!

कश्या वर्णु ह्या,.. ’कुंतल-क्रीडा’?
शब्द सांग ना,..’बटांसारखे’!

जगायचे ना?...लगेच लावा,
वृक्ष, निंब अन वटांसारखे!

भल्या माणसा, तुझे वागणे,
असो तिन्ही, मर्कटांसारखे!

शब्द, भाव हे, कसे ओळखू?
 तुझे प्रेमही,..नटांसारखे!
                  -मानस६





गझल: 

प्रतिसाद

हे  दोन  शेर आवडले-
वाहतेस तू, समीप इतक्या;
तुला जाणतो,.. तटांसारखे!

भल्या माणसा, तुझे वागणे,
असो तिन्ही, मर्कटांसारखे!

रंगाचा  शेरही  छान.
पण  बाकी  घट, वट, नट  हे  शेर  काही  'भटांसारखे'  बांधले  गेलेत असे  वाटत  नाहीत.
'वटांसारखे..' हा  शेर  अनावश्यक  आहे.

ही  गझल  वाचून  मला  माझीच  'फुलासारखी' ही  (फसलेली!) गझल  आठवली. :)
चूभूद्याघ्या.

चिरे लाव हे,.. तटांसारखे
शेर बांध अन,.. भटांसारखे!
इच्छा म्हणून ठीक.
कलोअ चूभूद्याघ्या