गझल

गझल

गझल

का, कधी, कोणी फुलांचे घाव होते पाहिले ?
फक्त बाजारात त्यांचे भाव होते पाहिले

भाबड्या डोळ्यांत अंजन होउनी निर्घृणपणे
अनुभवांचे झोंबरे शिरकाव होते पाहिले

ते बरे होते विरोधक उघड ज्यांची दुष्मनी
मी स्वकीयांचे छुपे अटकाव होते पाहिले

प्रेमपत्रें, पंचनामा, कागदाला एकसे
लेखणीचे सर्व त्याने स्राव होते पाहिले

निवडताना फूल नाही चाखले मकरंद मी
'भृंग', त्यानेही तुझे, बस, नाव होते पाहिले

गझल: 

Pages