रात्री जे घडले त्याची दिवसाला वार्ता नसते
रात्री जे घडते त्याची दिवसाला वार्ता नसते
पण पान बिचारे का हे दवबिंदू मोजत बसते?
वरवर आताशा मीही खुश असल्याचे दाखवतो
अन समजुतदारपणाने मग तीही खोटे हसते
ती समोर असते तेव्हा आकाश निरभ्रच असते
ती दूर जराशी होते अन हे घनघोर बरसते
ते कसे भेटणे? तो तर -लाटांचा केवळ तांडा!
पण आठवणींची वस्ती ह्या खोल तळाशी वसते!
पलिकडे जायची गंमत इच्छेला कोठे कळते?
मृत्यूच्या उंबरठ्याला ती हद्द समजुनी फसते
- प्रणव सदाशिव काळे
गझल:
प्रतिसाद
विसुनाना
मंगळ, 08/05/2007 - 09:39
Permalink
क्या बात है!
प्रत्येक शेर जबर्दस्त! क्या बात है!
वा! सगळेच अप्रतीम! वा! वा! वा!
काळेसाब, जिओ!
चित्तरंजन भट
मंगळ, 08/05/2007 - 13:53
Permalink
वा!
वरवर आताशा मीही खुश असल्याचे दाखवतो
अन समजुतदारपणाने मग तीही खोटे हसते
मस्त.
ते कसे भेटणे? तो तर -लाटांचा केवळ तांडा!
पण आठवणींची वस्ती ह्या खोल तळाशी वसते!
मस्त!
सगळेच शेर चांगले आहेत. गझल खूप आवडली.
राजदूत
मंगळ, 08/05/2007 - 14:52
Permalink
क्या बात है
मी विसूनाना व चित्तूशी सहमत आहे. मस्तच गझल आहे.
समीर चव्हाण (not verified)
मंगळ, 08/05/2007 - 17:27
Permalink
व्वा
छान जमलीय गझल
नितीन
बुध, 09/05/2007 - 09:22
Permalink
एकदम सही!
एकदम सही!
सोनाली जोशी
बुध, 09/05/2007 - 18:36
Permalink
छान
गझल आवडली.
कुमार जावडेकर
गुरु, 10/05/2007 - 17:23
Permalink
आकाश - डोळे
प्रणव,
सुंदर गझल... वृत्त अवघड वाटलं; पण कल्पना आणि मांडणी सुंदर आहे.
पण पान बिचारे का हे दवबिंदू मोजत बसते? - सुंदर..!
पलिकडे जायची गंमत इच्छेला कोठे कळते?
मृत्यूच्या उंबरठ्याला ती हद्द समजुनी फसते - वा!
आकाश निरभ्रची कल्पनाही आवडली. आकाश म्हणजे डोळे असाही अर्थ होऊ शकतो.
- कुमार
प्रदीप कुलकर्णी
शनि, 12/05/2007 - 01:30
Permalink
छान....
छान...
वरवर आताशा मीही खुश असल्याचे दाखवतो
अन समजुतदारपणाने मग तीही खोटे हसते
साधा, सहज, सोपा !
पलिकडे जायची गंमत इच्छेला कोठे कळते?
मृत्यूच्या उंबरठ्याला ती हद्द समजुनी फसते
अप्रतिम...मिश्किलही आहे, तत्त्वज्ञानपरही आहे....एकाच शेरात खूप काही साधले आहे....मस्त !
- तिसरा शेर वर का नाही घेतला..? आणखी एक मतला झाला असता !
असो...पुढची गझल येऊ द्या लवकरच !
अनंत ढवळे
शनि, 12/05/2007 - 10:10
Permalink
व्वा !
रात्री जे घडले त्याची दिवसाला वार्ता नसते
पण पान बिचारे का हे दवबिंदू मोजत बसते?
वरवर आताशा मीही खुश असल्याचे दाखवतो
अन समजुतदारपणाने मग तीही खोटे हसते
***************************मस्त गझल !
आभाळ
सोम, 14/05/2007 - 16:56
Permalink
सही!!
ते कसे भेटणे? तो तर -लाटांचा केवळ तांडा!
पण आठवणींची वस्ती ह्या खोल तळाशी वसते
क्लासिक शेर!!!
मक्ताही खल्लास!
संतोष कुलकर्णी
बुध, 16/05/2007 - 00:33
Permalink
खूपच छान!
खूपच छान!
आताशा वरवर मीही ... असे केले तर अधिक लयबद्ध्ता जाणवेल!
बहोत खूब!