दिसे हे रक्त साध्या माणसांचे
Posted by विश्वस्त on Saturday, 5 September 2009दिसे हे रक्त साध्या माणसांचे
( कुणी मारी न चाकू प्रेषितांना )
मनाप्रमाणे जगावयाचे किती किती छान बेत होते !
कुठेतरी मी उभाच होतो... कुठेतरी दैव नेत होते !
दिसे हे रक्त साध्या माणसांचे
( कुणी मारी न चाकू प्रेषितांना )
मी जरी हासून आता बोलतो आहे ऋतूंशी
ऐन तारुण्यात माझा चेहरा गंभीर होता !
चार शब्दांनीच आले का तुझ्या डोळ्यांत पाणी ?
सोड त्याचे बोलणे... तो एक वेडापीर होता !
एक मी निःशब्द किंकाळीच होतो...
ऐकण्यासाठी सुना बाजार होता
'नाव' हे त्या तुझ्या दिवाण्याचे
( काळजी घे जरा उखाण्याची )
राग नाही तुझ्या नकाराचा
चीड आली तुझ्या बहाण्याची !
आडवी एक तिथे भिंत मनाची आली..
दार होतेच कुठे आत शिरायासाठी ?
आपापल्या सुखाशी केला करार त्यांनी
मी बोचताच माझी केली शिकार त्यांनी