मी ऐकवली तेव्हाही तुज माझी हीच कहाणी...
Posted by विश्वस्त on Saturday, 5 September 2009मी ऐकवली तेव्हाही तुज माझी हीच कहाणी...
मी नाव तुझे तेव्हाही चुपचाप वगळले होते
आडवी एक तिथे भिंत मनाची आली..
दार होतेच कुठे आत शिरायासाठी ?
मी ऐकवली तेव्हाही तुज माझी हीच कहाणी...
मी नाव तुझे तेव्हाही चुपचाप वगळले होते
इतकेच मला जातांना सरणावर कळले होते
मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते
जरी या वर्तमानाला कळेना आमुची भाषा
विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही !
नाव घेऊ कुणाकुणाचे मी?
सोसतो मीच आजकाल मला
कुठे होतीस तू जेव्हा दिशा झंकारल्या होत्या ?
कुठे गेलीस तू जेव्हा ऋतू गंधाळुनी गेले ?
घे तपासून आपुले डोळे...
दाखवूही नको रुमाल मला !
मला आणून दे आधी जुन्या खाणाखुणा माझ्या
( तुला तेव्हा म्हणे माझा सुगावा लागला होता )
१६ जुलै १९८४ रोजी टिळक स्मारक मंदिर पुणे येथे झालेल्या एल्गार ह्या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणातून.