सोसले होते जरी मी दुःख माझे संयमाने
Posted by विश्वस्त on Sunday, 6 September 2009सोसले होते जरी मी दुःख माझे संयमाने
एकदा डोळ्यांत माझ्या आसवे आलीच होती !
भेटलेली माणसे घनदाट होती !
थेट पोचायास कोठे वाट होती ?
सोसले होते जरी मी दुःख माझे संयमाने
एकदा डोळ्यांत माझ्या आसवे आलीच होती !
जीवनाची सर्व पाने काय सोनेरीच होती ?
सारखी तेजाळणारी ओळ एखादीच होती !
सांग, मला दळणाऱ्या जात्या, जात नेमकी माझी !
ज्यांचे झाले पीठ मघा, ते कुठले दाणे होते ?
कसले माझे ? कुठले अपुले ? ते परकेच निघाले !
ज्यांनी धीर दिला , ते माझे कोण न जाणे होते ?
भेटलेली माणसे घनदाट होती !
थेट पोचायास कोठे वाट होती ?
मनाप्रमाणे जगावयाचे किती किती छान बेत होते !
कुठेतरी मी उभाच होतो... कुठेतरी दैव नेत होते !
देश हा बेमान झालेल्या ऋतूंचा
येथले आषाढसुद्धा आगलावे !
जन्मले घेऊन जे पायात काटा
त्या भणंगांनीच यात्रेला निघावे