शब्द माझे

शब्द माझे एवढे करतील आता
माझियावाचूनही तरतील आता

आजच्यापुरता पुरेसा ध्वस्त झालो
भावनांचे पूर ओसरतील आता

ऊर बडवू लागले सदरे सुखाचे
वेदना मौनात वावरतील आता

माणसांशी जवळचे नाते निघाले
श्वापदे कोणांस घाबरतील आता?

व्यापले आभाळ आता तारकांनी
झोपड्या दारिद्र्य पांघरतील आता

मारण्याआधीच केले माफही मी
काय तुमचे हात थरथरतील आता?

जाहले शिंपून माझे रक्त सारे
ताटवे बहुतेक मोहरतील आता

आणखी नाहीत जगल्याचे पुरावे
फक्त हे डोळेच पाझरतील आता

गझल: 

मलई : प्रदीप निफाडकर

अंथरतो मी जेव्हा चटई
डोळे मिटती वासे तुळई

मुले टिव्हीच्या समोर बसली
शुभंकरोती गाते समई

गरिबी अपुली अशीच राहो
आपण दोघे एकच दुलई

हळद उतरली पोर जळाली
कोपऱ्यात ही रडते सनई

कसेबसे जगतात कवी हे
कुबेर झाले सारे गवई

कविता माझी दुधाप्रमाणे
गझला म्हणजे नुसती मलई

-- प्रदीप निफाडकर

२९, रिद्धी-सिद्धी अपार्टमेंट्स, आनंदनगर,सिंहगड रस्ता, पुणे-४११ ०५१.भ्रमणध्वनी ९८५०३८४२३२. ईमेल : gazalniphadkar@com

गझल - अनंत ढवळे

एक औदासिन्य मागे राहिले
शेवटी हे शुन्य मागे राहिले

पांगले सर्वत्र निष्ठांचे धनी
आपले सौजन्य मागे राहिले

वाहुनी गेली किती संवत्सरे
केवढे मालिन्य मागे राहिले

संपले सौहार्द्र संबंधातले
गझल: 

Pages