नशा

जराशी जराशी नशा, ही चढावी
तुझी ऊब गात्रात, माझ्या असावी

जरा चोरुनी तू, मला न्याहळावे
जराशी तुझी, पापणी अन् लवावी

जरा लाजुनी तू 'नको रे' म्हणावे
मिठी लाजरी त्याचवेळी पडावी

तुझा श्वास, श्चासत माझ्या भिनावा
नशेला नव्याने, झळाळी चढावी

तुला मी, मला तू, असे नीववावे
पुन्हा एक ज्वाळा उफाळून यावी

-- सदानंद डबीर    

आपणांस काय वाटते?

ह्या संकेतस्थळाबद्दल आपले मत आणि ह्या संकेतस्थळाकडून आपल्याला असलेल्या अपेक्षा येथे मांडाव्यात. बदल आणि सुधारणा करताना अमूल्य मदत होईल.

'नवा प्रतिसाद द्या' ह्या दुव्यावर टिचकी द्या आणि आपला प्रतिसाद द्या. प्रतिसाद देताना किंवा लिखाण करताना अडचण येत असल्यास csbhat@gmail.com ह्या ई-मेल पत्त्यावर संपर्क साधावा. आपण वापरत असलेली ऑपरेटिंग सिस्टिम आणि अडचणीचे नेमके स्वरूप कळवावे.


Pages