मौक्तिकांत शिंपला शोधू

मौक्तिकांत शिंपला शोधू
नायकातही खला शोधू

कैक साल वाकलो नाही
वंद्य पावले, चला, शोधू

का जगास बोल लावावे ?
दोष का न आपला शोधू ?

खोल डोहसे तिचे डोळे
त्यात हरवल्या मला शोधू

सोडुनी जुनी भ्रमरवृत्ती
घट्ट प्रेमशृंखला शोधू

पैज अमृतातही जिंके
अशा शब्द‍आंचला शोधू

इंद्र हो‍उनी उभा याचक
धाव, कवच-कुंडला शोधू

अनसुया, प्रियंवदा नसता
'भृंग', चल शकुंतला शोधू

गझल: 

तुकारामांनंतरचा शब्दपूजक कवी : सुरेश भट

तुकारामांनंतर सुरेश भट हा पहिला कवी आहे की, ज्याने कवी म्हणजे आकाशातून टपकणारी दैवी विभूती वगैरे नसून शब्दसाधना आणि समाजाविषयी कळकळ यातून त्याला कवी व्हावे लागते, हा विचार दिला; अन्यथा कवी म्हणजे स्वयंभू अवतार, अशीच भूमिका लोकांनी व स्वतः कवींनीही समाजात प्रसृत केली होती.

Taxonomy upgrade extras: 

गझलचे दुसरे अंग

जमीन म्हणजे रदीफ आणि काफिया ह्यांची अशी काही चपखल सांगड की ज्याने गझलचा एक विशिष्ट मूड तयार होतो. तो मूड गझलभर पसरतो. आणि गझल वाचकांच्या , रसिकांच्या मनात घर करते. ही जमीन योग्य निवडणे व शेवटपर्यंत सांभाळणे ही मोठी कठीण गोष्ट आहे.

Pages