गझल

गझल

सहज फिराया आलेला सासरला श्रावण.

करवंदीने रिमझिमणारा स्मरला श्रावण
घाटा घाटा वरुनी मग वावरला श्रावण

संसाराची अक्कल नाही ना त्याला घर
माहित होते सगळे मग का वरला श्रावण?

फोलच काड्या ती वेडी जोडत बसलेली

गझल: 

..ते मोहरू

एकटी मी पाहता जग लागले ते मोहरू
लांडग्याचे भक्ष आता जाहले ते कोकरू

डौल माझा राजहंसी लागलो मी सावरू
बदक आहे मी कळे अन लागले ते हो धरु

सांगते माझ्या मना वेड्या नको तू घाबरू

गझल: 

कोडे

आयुष्याचे कोडे कधीच सुटले नाही
उत्तर या प्रश्नाचे कधीच सुचले नाही

झाले ऐश्वर्याचे जुने सोहळे आता
स्वप्नांमधले घोडे कधीच उठले नाही

कागद कागद ओला करतच गेली शाई
अर्थालाही कसले कारण उरले नाही

गझल: 

गरीबाला कुठे सांगा कुणाला टाळणे येते?

सरावाने अता त्या वेदना सांभाळणे येते
जरी झडले बहर सारे तरी गंधाळणे येते

खरे आहे मला रडणे तसे जमलेच नाही हे
अता दुखर्‍या नभाखाली असे रेंगाळणे येते

जगाला माहिती आहे मला चकवून गेली ती

गझल: 

श्वास झालो

मी कळ्यांचा श्वास झालो
की फुलांचा वास झालो

ह्या सुगंधा चाखताना
भ्रुंग मी नावास झालो

सावलीला सोडले मी
मी उन्हाचा त्रास झालो

पाहता ती मुग्ध अदा
आज तीचा दास झालो

वाढली ती हाव माझी

गझल: 

हेच असे असते जगणे...

हेच असे असते जगणे
जे घडते नुसते बघणे

हे न कधीच कुणा सुटले
भास उगाचच पांघरणे

ध्यास कुणास बघा असतो...
'ठेच उरातच बाळगणे'

सत्य मनास पटेल कसे ?
फक्त हवे जर थोपटणे

व्यर्थ ठरेल उगीच अता

गझल: 

..काय मी

माझे मला ना कळे, केले काय मी?
त्या पायरीशी कसे नेले पाय मी

का चोरला घास माझ्या त्यागातला?
ते ताक होते जळालेले, साय मी!

ना राहिली ओढ, भेटू कोणास मी?
माझ्याकडे ओढले गेले काय मी?

गझल: 

छानपैकी जगून गेलो मी.....

छानपैकी जगून गेलो मी
छान होतो... म्हणून गेलो मी

प्यायलो कोळुनी विषय सारे
फक्त डोक्यावरून गेलो मी

चेहरा खूपसा बदललेला
काल माझ्यापुढून गेलो मी

ती दिसावी म्हणून गेलो.. पण..

गझल: 

Pages