कोडे
आयुष्याचे कोडे कधीच सुटले नाही
उत्तर या प्रश्नाचे कधीच सुचले नाही
झाले ऐश्वर्याचे जुने सोहळे आता
स्वप्नांमधले घोडे कधीच उठले नाही
कागद कागद ओला करतच गेली शाई
अर्थालाही कसले कारण उरले नाही
कोणी आले नाही निरोप देण्या मजला
मी गेल्यावर मागे कुणीच झुरले नाही
पानेही सळसळली हळूच येता वारा
कारण आनंदाचे कुणीच पुसले नाही
कितीक वाटा आल्या कितीक आली वळणे
आभाळाचे पाणी कुठेच मुरले नाही
वाटेवरती माझ्या तुझी नजर उलगडली
(ओठावरती गाणे उगीच फुटले नाही!!)
गझल:
प्रतिसाद
बेफिकीर
सोम, 07/06/2010 - 16:31
Permalink
कोणी आले नाही निरोप देण्या
कोणी आले नाही निरोप देण्या मजला
मी गेल्यावर मागे कुणीच झुरले नाही
पानेही सळसळली हळूच येता वारा
कारण आनंदाचे कुणीच पुसले नाही
कितीक वाटा आल्या कितीक आली वळणे
आभाळाचे पाणी कुठेच मुरले नाही
फर्स्टक्लास!
ह बा
सोम, 07/06/2010 - 16:37
Permalink
स्वप्नांमधले घोडे कधीच उठले
स्वप्नांमधले घोडे कधीच उठले नाही
छान.
अजय अनंत जोशी
सोम, 07/06/2010 - 19:09
Permalink
कितीक वाटा आल्या कितीक आली
कितीक वाटा आल्या कितीक आली वळणे
आभाळाचे पाणी कुठेच मुरले नाही
वा! छान.
आनंदयात्री
मंगळ, 08/06/2010 - 09:13
Permalink
सुंदर,,, एक सूचना.. "झाले
सुंदर,,,
एक सूचना..
"झाले ऐश्वर्याचे जुने सोहळे आता" ऐवजी "जुने सोहळे झाले ऐश्वर्याचे आता" असं केलं तर वाचताना लयीत येईल...
धन्यवाद..