गझल

गझल

कशाला ?

ओळींचे जंजाळ कशाला..?
शब्दांची आबाळ कशाला..?

निर्मळ पाणी डोळ्यांमधले
अभिव्यक्तीचा गाळ कशाला..?

शांती ह्रदयातच शोधावी..,
फिरतो रानोमाळ कशाला...?

या भजनातच भक्ती नाही..!
..ढोलक आणिक टाळ कशाला..?

तो त्याच्या मरणाने मरतो..
यावा लागे काळ कशाला ?

बदफैली ही जातच ज्याची,
त्याला कुठली नाळ कशाला .?

सहवासाने फुलवू ह्रदयी,
चंद्राला आभाळ कशाला ...?

थार्‍यावरती नाही जे मन,
त्याचाही सांभाळ कशाला ..?

जगताना जे जळतच गेले,
त्या प्रेताला जाळ कशाला ..?

चाल तुझी...अन् ताल धरी मन,
..तुजला पैंजण, चाळ कशाला...?

मी तर कबुली देतो आहे..
तुमचे खोटे आळ कशाला ...?

- प्रा.डॉ. संतोष कुलकर्णी, उदगीर

गझल: 

वाटले बरे किती!

भेटती जपून टवटवीत चेहरे किती!
सोबतीस आणती सुगंध बोचरे किती!

मी अजून खरवडून चेहर्‍यास पाहतो
ह्या चर्‍यांशिवाय आत आणखी चरे किती?

प्रश्न हा विचारतात कुंपणांस कुंपणे-

गझल: 

Pages