...मी हासतो आहे
कराराने जिवाच्या मी दु:ख हे साहतो आहे
नका चेष्टा करू माझी जरी मी हासतो आहे
किती आले किती गेले, ना कुणी कधि माझे झाले
बैल घाण्याचा एकाकी जिणे हे वाहतो आहे
मला आता नसे इच्छा तुझ्या साथीने जाण्याची
पाहुनी वेग तुझा, माझा ऊर हा धापतो आहे
चमकली वीज क्षणभरी अन समोरच शिखर मला दिसले
मार्ग हे सारे अंधारे पुन्हा मी शोधतो आहे
किती केल्या विनवण्या अन कितीदा पडलो मी पाया
कसा निष्ठूर होऊनी देव मज पाहतो आहे
त्रासलो जरि ह्या जगण्याने, नाहि मी हारलो येथे
सोसुनी वेदना सार्या, सदा मी हासतो आहे
गझल: