जपून ठेवले

इथे अनंत घाव मी जपून ठेवले
प्रचंड आज दाह मी जपून ठेवले ।


विखुरलेस चांदणे इथे कसे तुझे?
इथेच चंद्र हाय मी जपून ठेवले ।


मागतेस काय आज मागची फूले
तसे कुठे गं काय मी जपून ठेवले?


काल तू जिथे हळूच ओठ टेकले
अर्धचंद्र लाल मी जपून ठेवले ।


आपुलेच यार दोस्त भेटले तरी
मैफलीत पाय मी जपून ठेवले ।


काय व्यर्थ वटतसे प्रित ही तुला?
हाय रे! कुणास मी जपून ठेवले !


झेलले कितीक कष्ट काल माय ने
खडबडीत हात मी जपून ठेवले ।

गझल: 

प्रतिसाद

मी जपून ठेवले... सुंदर गझल.... काल तू जिथे हळूच ओठ टेकले... सुंदर... शब्दात हळुवारपणा हा गझल चा स्थायीभाव जाणवतो.. लिहीत रहा.. शुभेच्छा
[प्रतिसाद देवनागरी लिपीत द्यावा-विश्वस्त]

हा शेर खूप आवडला.
--योगेश वैद्य.

मागची फुले आणि माय हे शेर विशेष आवडले!

keep it up ............appreciate

झेलले कितीक कष्ट काल माय ने
खडबडीत हात मी जपून ठेवले ।
 
अप्रतिम्......शेर
सुनिल देशमुख

मनिषा...मस्त
ए ओळखलस का..कट्ट्यावर भेटलेलो आपण गं
कुसुमग्रज कट्टा...सोनेगाव तलाव

मागतेस काय आज मागची फूले
तसे कुठे गं काय मी जपून ठेवले?
आणि
आपुलेच यार दोस्त भेटले तरी
मैफलीत पाय मी जपून ठेवले ।
मस्त हं !! आवडली गझल.