जपून ठेवले
इथे अनंत घाव मी जपून ठेवले
प्रचंड आज दाह मी जपून ठेवले ।
विखुरलेस चांदणे इथे कसे तुझे?
इथेच चंद्र हाय मी जपून ठेवले ।
मागतेस काय आज मागची फूले
तसे कुठे गं काय मी जपून ठेवले?
काल तू जिथे हळूच ओठ टेकले
अर्धचंद्र लाल मी जपून ठेवले ।
आपुलेच यार दोस्त भेटले तरी
मैफलीत पाय मी जपून ठेवले ।
काय व्यर्थ वटतसे प्रित ही तुला?
हाय रे! कुणास मी जपून ठेवले !
झेलले कितीक कष्ट काल माय ने
खडबडीत हात मी जपून ठेवले ।
गझल:
प्रतिसाद
किरण येले (not verified)
मंगळ, 22/04/2008 - 15:43
Permalink
मी जपून ठेवले...
मी जपून ठेवले... सुंदर गझल.... काल तू जिथे हळूच ओठ टेकले... सुंदर... शब्दात हळुवारपणा हा गझल चा स्थायीभाव जाणवतो.. लिहीत रहा.. शुभेच्छा
[प्रतिसाद देवनागरी लिपीत द्यावा-विश्वस्त]
योगेश वैद्य
बुध, 23/04/2008 - 18:53
Permalink
अर्धचंद्र लाल
हा शेर खूप आवडला.
--योगेश वैद्य.
पुलस्ति
बुध, 23/04/2008 - 23:21
Permalink
छान!
मागची फुले आणि माय हे शेर विशेष आवडले!
Raj Chakre (not verified)
शुक्र, 13/06/2008 - 21:46
Permalink
keep it up
keep it up ............appreciate
Sunil Deshmukh
सोम, 30/06/2008 - 16:13
Permalink
झेलले
झेलले कितीक कष्ट काल माय ने
खडबडीत हात मी जपून ठेवले ।
अप्रतिम्......शेर
सुनिल देशमुख
निरु सुरुचि
सोम, 30/06/2008 - 21:07
Permalink
मनिषा...मस्
मनिषा...मस्त
ए ओळखलस का..कट्ट्यावर भेटलेलो आपण गं
कुसुमग्रज कट्टा...सोनेगाव तलाव
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मंगळ, 01/07/2008 - 21:44
Permalink
छान
मागतेस काय आज मागची फूले
तसे कुठे गं काय मी जपून ठेवले?
आणि
आपुलेच यार दोस्त भेटले तरी
मैफलीत पाय मी जपून ठेवले ।
मस्त हं !! आवडली गझल.