हात द्या, मात द्या ...
हात द्या, मात द्या वा कुणी काट द्या
सोसतो कालचा आजही नाट द्या
भावना ओतल्या घागरी साठल्या
धावण्या शब्द हे सागरी लाट द्या
दान जे चोरले भासलो क्रूर मी
सज्जना पाहण्या मोकळी वाट द्या
मानपाना दिली पांघरा शाल ही
येतसे लाटण्या तेच बोभाट द्या
भ्रांत या जीवनी साधले नेमके
शांतता द्या वरी, आंत गोंगाट द्या
थाट मांडू नका बोलण्या पोरका
जेवण्याही नको कोरडे ताट द्या
वासरे लागली दूध चाटावया
पीडितां एक अश्रू तरी दाट द्या
गझल: