शांततेने चालुदे
Posted by बेफिकीर on Wednesday, 13 January 2010मोह, पापे, लोभ, हेवा, शांततेने चालुदे
ईश्वरा इंद्रीय-सेवा शांततेने चालुदे
ठेवतो पेढे, फुटाणे, वाकतो दगडापुढे
मीच म्हणतो खात मेवा, शांततेने चालुदे
जन्म जाळ्यातील माशासारखा केलास तू
मला आणून दे आधी जुन्या खाणाखुणा माझ्या
( तुला तेव्हा म्हणे माझा सुगावा लागला होता )
गझल
मोह, पापे, लोभ, हेवा, शांततेने चालुदे
ईश्वरा इंद्रीय-सेवा शांततेने चालुदे
ठेवतो पेढे, फुटाणे, वाकतो दगडापुढे
मीच म्हणतो खात मेवा, शांततेने चालुदे
जन्म जाळ्यातील माशासारखा केलास तू
काय हा रस्ता तुझ्या शहरातला
वाटतो प्रत्येक परका आपला
चांगले ठरवाल जेथे घालणे
पाय तेथे नेमका मी घातला
न्यायचा कोठे न जाणे शेवटी
केवढा अनुभव अताशा साचला
मी विचाराधीन व्हावे एकदा
ना मिळे ती भाकरीही बघाया
रोज धोंड्याची उशी ती निजाया
नित्य वाया अक्षतांचा ढिगारा
तांदळाची पेज, तीही, न प्याया
वाळलेल्या रोपट्यांचा नजारा
लागली ती जंगलेही रडाया
कर्जफेडाया जगावे कशाला
मोडले नाते कधी ते बालकाला ना कळे
वाट पाहाते डहाळी पाखराला ना कळे
तोडता फांदी, घळाळा ढाळते अश्रूच ती
लाघवी ते वागणे, का? घात झाला ना कळे
ओतले आयुष्य त्यांनी हेच नाही जाणले
भावना॑चा दीप...
भावना॑चा दीप विझल्यासारखा
काळ हा काळीज नसल्यासारखा
आपला स॑ब॑ध थकल्यासारखा
शेवटाचा श्वास उरल्यासारखा
रोज भेटे दुक्ख कोणाचेतरी
रोज र्हिद्यी मी करपल्यासारखा
-----------------------------------------
प्रेम माझे तुझे केवढे खुंटले,
शब्द होते तरी बोलणे खुंटले !
वाढले रोप जे काल सर्वांमधे,
खुंटतांना किती एकटे खुंटले !
मागतांना किती दूर होतास तू,
नव्यासाठी नवे काही मला घडवायचे होते
जुन्या पर्वातले संदर्भही बदलायचे होते
तुझ्यासाठीच बहराच्या ऋतूंना रोखले होते,
तुला आनंदयात्रेचे निमंत्रण द्यायचे होते
भिकार डाव, चला काव्य सावकार करू
उरू मरून, कहाणी सदाबहार करू
गुमान कैद बटेला जरा चुकार करू
तुझी बहार तुझ्याहुन बहारदार करू
जिथे तिथे दिसणे मी, अता न सोसवते
चला स्वतःत स्वतःला अता फरार करू