गझल

गझल

दुःखे

का निरागस सोबत्यांना मी दिली दुःखे?
जन्मभर एका चुकीतुन भोगली दुःखे

दुःख विसराया जरी मी प्यायलो थोडा...
प्यायला माझ्याच संगे बैसली दुःखे

मज सुना एकांत माझा आज आवडला

गझल: 

निखारे

नालायकांस कोणी द्यावे किती इशारे
उडवून झोप त्यांची जाती पहाटवारे!

छिद्रामुळे बुडाली त्यांची अजस्र नौका
आता तरींमधूनी ते शोधती किनारे!

मैत्रीस जागुनी मी त्यांच्या मिठीत गेलो

गझल: 

दूरचा किनारा

करण्यास पार क्षितिजे पाउल मी उचलले
रस्ते निघून गेले, मागे मला विसरले

भर श्रावणात जेव्हा दुष्काळ पाहिला मी
या भूतलास माझ्या अश्रूंत मी भिजवले

येणार ना कधीही माझा वसंत आता

गझल: 

तुकारामा..

किती आले किती गेले महाज्ञानी तुकारामा..
कुणीही पोचला नाही तुझ्या स्थानी तुकारामा..

जरी हे लाभले आम्हा विचारांचे करंटेपण..
करी श्रीमंत जगण्याला तुझी वाणी तुकारामा..

गझल: 

त्यांनी.....

काढता घेतला पाय त्यांनी...
शोधला छान पर्याय त्यांनी...

दूध नावास मी राहिलेलो...
काढली एवढी साय त्यांनी...

वाढवुन आपल्यातील गुंता...
मोकळा मार्ग केलाय त्यांनी...

गझल: 

पाखरे खाऊन गेली चाळलेल्या वेदना

काठभरल्या घागरीतुन गाळलेल्या वेदना
नाचल्या माहेरभर सांभाळलेल्या वेदना

पीठ आहे अडकुनी जात्यात आरीभर जरी
पाखरे खाऊन गेली चाळलेल्या वेदना

तीच ती भांडी घरी आहेत तुटकी आजही

गझल: 

'चुकलो' म्हणेन मी तर सोकावतील सारे

'चुकलो' म्हणेन मी तर सोकावतील सारे
शिक्षाच शेकडोंनी ठोठावतील सारे

उल्लेख आपले तू वेळीच टाळ आता
येताच नाव माझे भंडावतील सारे

आडून ओढणीच्या उगवेल चंद्र माझा
डोळ्यांमधून तारे डोकावतील सारे

गझल: 

गझल : प्रा.रुपेश देशमुख

सेकंदाच्या काट्यावरती जिवास ठेवा
जगण्यासाठी एक निरंतर प्रवास ठेवा.

हवा कशाला आनंदी आनंद नेहमी
दिवसाकाठी दोन्-चार क्षण उदास ठेवा.

लोकहिताच्या सर्व योजना खाउन टाका

गझल: 

Pages