पुलस्ति ह्यांच्या गझला

ह्या संकेतस्थळावर सुरवातीपासूनच गंभीरपणे, जबाबदारीने सकस गझललेखन करणारे पुलस्ति ह्यांच्या २५ गझला एकत्रित सादर करताना आम्हाला अत्यंत आनंद होतो आहे. पुलस्ति यांच्या यापुढील गझललेखनालाही आमच्या हार्दिक शुभेच्छा. यापुढेही त्यांच्या अशाच गझला या संकेतस्थळावर वाचायला मिळतील, ही अपेक्षा.

Taxonomy upgrade extras: 

प्रतिसाद

याबद्दल पुलस्तिंचे अभिनंदन आणि विश्वस्त यांचे आभार.
सोनाली

पुलस्ति यांचे अभिनंदन. एकत्र गझला वाचण्याचा आनंद काही विरळाच. आता तो निवांतपणे घेतो. ही खूण टाकून ठेवली आहे.

पुलस्ति,
तुमच्या गझलेला अशीही दाद मिळते आहे.
बरे वाटले.
 
 

माझ्या गझला अशा एकत्रित स्वरूपात दिल्याबद्दल विश्वस्तांचे मनापासून धन्यवाद. गझलेमधली मी घेतलेली २-४ बाल-पावलं ही जालावरच घेतली आहेत. माझ्या वेड्यावाकड्या प्रयत्नाना प्रोत्साहन आणि मार्गदर्शन मिळत राहिलं नसतं तर काहीच लिहिता आलं नसतं. आणि त्यात सुरेशभट.इन चा वाटा मोठा आहे. शिकण्यासारखं अजूनही अर्थातच खूप खूप आहे. प्रयत्न सूरू ठेवीन. हा लोभ असाच राहू द्यावा!
पुन्हा एकदा विश्वस्तांचे आणि इथल्या सर्व गझलप्रेमींचे धन्यवाद!! 

पुलस्तिंचे  हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा !


पुलस्ती यांचे मनापासून अभिनंदन.
यापुढेही अशाच कसदार गझला त्यांच्याकडून लिहिल्या जातील, याची खात्री आहे.
पुढील वाटचालीला हार्दिक शुभेच्छा.

अत्यंत उत्तम आशयाच्या, दीर्घकाळ लक्षात राहणार्‍या ओळी असलेल्या व अर्थातच बिनचूक अशा आपल्या गझला असतात. त्यांचा संग्रह निघणे हे आवश्यकच होते. आपल्या या संग्रहातील अनेक गझला अतिशय आवडल्या. दुसर्‍या संग्रहाकडे आपली वाटचाल चालू राहावी अशी मी प्रार्थना करतो. मला व्यक्तिशः आपला हा संग्रह प्रकाशित झाल्याचा अतिशय आनंद झाला आहे.

आपले व विश्वस्तांचे हार्दिक अभिनंदन!