गुंता

आज असेही करेन म्हणतो
म्हणायचे ते म्हणेन म्हणतो

पुन्हा मनाचा गुंता झाला
पुन्हा जरा विंचरेन म्हणतो

टिपतो आता दु:खाचे कण
सवडीने कळवळेन म्हणतो

इथे जरी वापरात नाही
तरी नोट ही जपेन म्हणतो

मला सुचेना कविता आता
मी कवितेला सुचेन म्हणतो

मर्द मराठा "जगलो मी जर -
पुन्हा तुझ्याशी लढेन" म्हणतो

तुम्ही पुरावे मागा, शोधा...
मला मीच उद्धरेन म्हणतो
गझल: 

प्रतिसाद

पुन्हा मनाचा गुंता झाला
पुन्हा जरा विंचरेन म्हणतो
इथे जरी वापरात नाही
तरी नोट ही जपेन म्हणतो


 

इथे जरी वापरात नाही
तरी नोट ही जपेन म्हणतो
व्वा व्वा !! मस्त  शेर !!

पुन्हा मनाचा गुंता झाला
पुन्हा जरा विंचरेन म्हणतो
वा!

टिपतो आता दु:खाचे कण
सवडीने कळवळेन म्हणतो
वा!

इथे जरी वापरात नाही
तरी नोट ही जपेन म्हणतो१
वा!

मला सुचेना कविता आता
मी कवितेला सुचेन म्हणतो
वा!

मतलाही सहज आहे. पुलस्ति, एकंदर गझल फार आवडली. 
चित्तरंजन

१. ह्या शेरावरून माझाच एक शेर आठवला. तो असा --
इथे वाजायची खोटीच नाणी
कधी चलनात होतो फारसा मी ?

गझल छानच आहे. आवडली. पुढील शेर तर विशेष आवडले -
पुन्हा मनाचा गुंता झाला
पुन्हा जरा विंचरेन म्हणतो

टिपतो आता दु:खाचे कण
सवडीने कळवळेन म्हणतो

शेवटच्या शेरात पुरावे मागणे, शोधणे आणि उध्दार करणे/होणे यातला संबंध मला नीटसा न कळल्याने शेर जरा अस्पष्ट वाटला. चूभूद्याघ्या.
- चक्रपाणि जीवन चिटणीस

तुम्ही पुरावे मागा, शोधा...
मला मीच उद्धरेन म्हणतो
दिलतक या शब्दातच दाद सामावली आहे..

टिपतो आता दु:खाचे कण
सवडीने कळवळेन म्हणतो
लय भारी . जब्रा ग़ज़ल.

खुपच छान.