चंदन
मनासारखे मन नाही
अन दुसरे साधन नाही
व्यर्थ झिजवतो देहाला
विचारात चंदन नाही!
हवे तेच उत्तर आले
पण... आले चटकन नाही
कशी रचू सुंदर कविता?
सुंदर हे जीवन नाही
दिवाळखोरीचे युग हे
रोखठोक चिंतन नाही
गझल:
कशास व्यासपीठ पाहिजे तुला?
घराघरात गीत गुणगुणून जा
प्रतिसाद
ज्ञानेश.
रवि, 22/02/2009 - 12:20
Permalink
क्या बात है..
अजून एक उत्कृष्ट अल्पाक्षरी गझल.
कशी रचू सुंदर कविता?
सुंदर हे जीवन नाही ....हा शेर फार आवडला.
धन्यवाद!
प्रदीप कुलकर्णी
रवि, 22/02/2009 - 23:14
Permalink
उत्तम...
मनासारखे मन नाही
अन दुसरे साधन नाही
वा...
हवे तेच उत्तर आले
पण... आले चटकन नाही
उत्तम...
कशी रचू सुंदर कविता?
सुंदर हे जीवन नाही
...हीच तर कसोटी आहे !!! :) कुरूप विषयावर सुंदर कविता लिहा... विषय कुरूप; पण कविता सुंदर ! :)
-------------------------
शब्दनिवडस्वातंत्र्याचा तुमचा अधिकार अबाधित ठेवून (उच्चारणसुलभतेच्या दृष्टीने ) एक सुचवावेसे वाटत आहे, ते असे -
ध्वनिसाधर्म्य असलेली अक्षरे (न नाही )एकापुढे एक शक्यतो आणू नयेत; संपूर्ण गझलेत तरी. एखाद्या-दुसऱ्या शेरात (अगदीच इलाज नसेल तेव्हा) चालेलही.
या संपूर्ण गझलेत `नाही` या अन्त्ययमकाऐवजी `कोठे` हा शब्द घालून पाहा बरे...! हां, त्यामुळे सगळी गझलच प्रश्नचिन्हांकित होईल खरी !! :)
पुलस्ति
सोम, 23/02/2009 - 19:42
Permalink
धन्यवाद प्रदीपजी...
"न नाही" चा मुद्दा पुढे आवर्जून लक्षात ठेवीन. धन्यवाद!!
चित्तरंजन भट
सोम, 23/02/2009 - 20:19
Permalink
हवे तेच उत्तर आले
छान गझल आहे.
हवे तेच उत्तर आले
पण... आले चटकन नाही
हा शेर आवडला!
कल्पना शिन्दे
गुरु, 19/03/2009 - 10:45
Permalink
चन्दन
'कशी रचू सुन्दर कविता,
सुन्दर हे जीवन नाही.'द
सुखात जीवन सुन्दर वाट्ते पण दु:खसुदा सुन्दर शब्दात व्यक्त करता येते!