श्वास



सूत मी जरा धरून पाहतो
मी मलाच चाचपून पाहतो

जो चुकून घेतलाच मोकळा 
श्वास - त्यास थांबवून पाहतो

बूंद-हौद -जाणतोच मी तरी  
का उगाच निस्तरून पाहतो?


साठवून ठेवतो खुणा खुणा
मी पुन्हा पुन्हा वळून पाहतो

ते मलाच शोधते चहूकडे
वादळास मी भिडून पाहतो

वेळ ही अशी - जपून बोलतो
मी दिसेल ते दुरून पाहतो

मी अजून शोधतोच कारणे
तो जमेल ते करून पाहतो

सापडेल, सापडेलही झरा
खोल खोल मी खणून पाहतो

मी शिव्याच देत राहिलो इथे
तो जिवास हासडून पाहतो



गझल: 

प्रतिसाद

जो चुकून घेतलाच मोकळा 
श्वास - त्यास थांबवून पाहतो...छान

वेळ ही अशी - जपून बोलतो
मी दिसेल ते दुरून पाहतो... सुंदर

 


 

वेळ ही अशी ,जपून बोलतो.....
क्या बात है !!
 

वा पुलस्ति,
सुंदर गझल. आवडली.
धोंडोपंत
आम्हाला इथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

पुलस्ति, सुंदर गझल.

जो चुकून घेतलाच मोकळा 
श्वास - त्यास थांबवून पाहतो
वा!

वेळ ही अशी - जपून बोलतो
मी दिसेल ते दुरून पाहतो
क्या बात है!

सापडेल, सापडेलही झरा
खोल खोल मी खणून पाहतो
वा!
वरील शेर विशेष आवडले.