पुन्हा पुन्हा !!
Posted by supriya.jadhav7 on Saturday, 4 December 2010तुझाच स्पर्श मल्मली छळेल हा पुन्हा पुन्हा !
तुझ्या स्म्रृतीत चांदवा जळेल हा पुन्हा पुन्हा !!
उनाडतो, पिसाटतो, ठरे कुठे वरुण हा?
सलज्ज ओठ चुंबिण्या वळेल हा पुन्हा पुन्हा !!
मी जरी हासून आता बोलतो आहे ऋतूंशी
ऐन तारुण्यात माझा चेहरा गंभीर होता !
तुझाच स्पर्श मल्मली छळेल हा पुन्हा पुन्हा !
तुझ्या स्म्रृतीत चांदवा जळेल हा पुन्हा पुन्हा !!
उनाडतो, पिसाटतो, ठरे कुठे वरुण हा?
सलज्ज ओठ चुंबिण्या वळेल हा पुन्हा पुन्हा !!
आज भारंभार झाली आसवे !!!
.
*
पापण्यांना भार झाली आसवे,
कैकदा ’गद्दार’ झाली आसवे !
*
साजणाचे ओठ गाली टेकता,
लाजरा शृंगार झाली आसवे !
*
झोंबरे होते तडाखे वादळी,
जातात वृक्ष वादळात, तरती पाती,
आभाळ पेल तू, नकोस विसरू माती
प्रत्येक पावलागणिक बेट काट्यांचे,
माझीच पैंजणे दगा देउनी जाती
केव्हाच सोडली माझी वाट दिव्यांनी,
अंधार एकला जन्माचा सांगाती
भाकरीची भ्रांत नाही, भूक मेली...शल्य आहे
रंगलेल्या जीवनाचे हे खरे वैफल्य आहे
वाजती कानात माझ्या प्रार्थनेचे सूर मंजुळ
बघ तुझ्या येण्यामधे हे केवढे मांगल्य आहे
एक ओठी,एक पोटी,जाणल्यागत वाटते
हात ते फैलावणे,आता न स्वागत वाटते
गोड वाणी मागचे अनुभव कडू आल्यावरी,
बोलणे सामोपचाराचे ''कलागत'' वाटते.
दाब दु:खाचा पडावा अंगवळणी एवढा,
प्रेम आता मी स्वतः वर करत नाही
श्वास घेतो, हे खरे; पण जगत नाही...
भ्रमर इतके भोवती फिरती तरीही
फूल त्याच्या पाकळ्यांना मिटत नाही
प्रेम जुळल्यावर कशाला बोलशी हे -
तू .....
.
*
कधी, कशी, कुठे सखे, नभा मिळे धरा इथे?
न सावलीस लाभणार चेहरा खरा इथे !
*
पहाट पारिजात हा जरी लुभावि अंगणा ,
तुझाच गंध माळुनी सलज्ज मोगरा इथे !
*
मोडून यार गेला संसार आज माझा
माझ्या मिठीत रडला घरदार आज माझा..
स्वप्ने तिचीच सारी दिनरात रंगवीली
तो कुंचलाच झाला बेजार आज माझा..
ना थांब मी म्हणालो अन् थांबली न ती ही