जिथे मी पोचलो तेथे तुझे माहेर होते
Posted by बेफिकीर on Wednesday, 15 December 2010गुलाबी गाव होते, ताटवे चौफेर होते
जिथे मी पोचलो तेथे तुझे माहेर होते
मला पाहून विरघळतेस हे माहीत आहे
तसे आतून होते का जसे बाहेर होते?
मला डोळे मिटावे लागले ही बोच नाही