कळा लागल्या
Posted by क्रान्ति on Friday, 31 December 2010कळा लागल्या पार आतून होत्या
किती यातना खोल दाटून होत्या!
जरी घाव आता उभारून आला,
मुळाखालच्या वेदना जून होत्या
तुला पाहता मी मलाही भुलावे,
अशा सूचना काळजातून होत्या!
मी कुठे होतो शहाणा ? मी कुठे होतो हिशेबी ?
मी जरी बेरीज केली ती वजाबाकीच होती !
कळा लागल्या पार आतून होत्या
किती यातना खोल दाटून होत्या!
जरी घाव आता उभारून आला,
मुळाखालच्या वेदना जून होत्या
तुला पाहता मी मलाही भुलावे,
अशा सूचना काळजातून होत्या!
तुला पाहून माझा शब्द - तेव्हा लाजला होता
मुका राहुनही मझा - अबोला गाजला होता
तुझा तो स्पर्श चंदेरी -तुझा तो हात पुनवेचा
उन्हाचा हात ही माझा - अचानक भाजला होता
सोकावलेल्या अंधाराला इशारा
सोकावलेल्या अंधाराला, इशारा आज कळला पाहिजे
वादळ येऊ दे कितीही पण, हा दीप आज जळला पाहिजे
आंब्याला मानायचे कांदा, किती काळ असेच चालायचे?
प्रेमभावना न रोखली कधी मनात मी
सावली तुला दिली नि राहिलो उन्हात मी
बांधला महाल मी तुला सुखात ठेवण्या
घर कधी करेन गे तुझ्याच काळजात मी?
साथ लाभता तुझी,कसे तरुण वाटते
गंधात दुनिया न्हाईल वा तो उरणार नाही
पर्वा फुलांना कोमेजलेल्या असणार नाही
माझी उजळणी भरपूर झाली असली तरीही
ईच्छीत उत्तर सहसा कधीही स्मरणार नाही
ठाऊक आहे वाटायचे सुख कैसे जगाला
अदृश्यच असतो क्रूस कधी
प्रेषित नसतो माणूस कधी
काही जखमा भरतात कुठे
खातात मुळासह ऊस कधी
मी तळमळतो, मी हरमळतो
ही कूस कधी, ती कूस कधी
आहेसच की माझ्यातच तू
अजिबात नको भेटूस कधी
जग जरी भलत्या नशेने चूर आहे
वेदना माझी मला मंजूर आहे
राखतो या चेहर्याला निर्विकारी
लपविण्या हृदयातले काहूर आहे
सांत्वनाचे बांध घालावे कितीही
वाहताहे आसवांचा पूर आहे
वीट आला जरी शिसार्यांचा
हात होतो पुढे भिकार्यांचा
होत नाहीत जे स्वतःचेही
कोण वाली अशा बिचार्यांचा
आज नसतील... काल होते ते
ठेव आदर्श त्या सितार्यांचा
राबती जीवने कुणासाठी