वळता वळता
Posted by वीरेद्र बेड्से on Thursday, 13 January 2011टाळलेस तू मागे बघणे वळता वळता
ती नजरेची भेट राहिली घडता घडता
या मातीचा लळा असावा सूर्यालाही
हिरमुसला तो उदासवाणा ढळता ढळता
वेड विलक्षण बघ रात्रीचे काजव्यासही
नदीकिनारी सखी शोधतो जळता जळता