शे(अ)रो शायरी, भाग-७ : वो लब कि जैसे सागर-ए-सहबा दिखाई दे
Posted by मानस६ on Sunday, 31 October 2010शे(अ)रो शायरीच्या ह्या ७व्या भागात आपण कृष्णबिहारी नूर ह्यांच्या एका, अतिशय रोमॅंटीक मतला असलेल्या, गझलेचा आस्वाद घेणार आहोत. ही गझल मी पहिल्यांदा नेटवर, दुबईला झालेल्या एका मुशायऱ्याच्या ऑडियो क्लिपमधे ऐकली, तेथे तिला श्रोत्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता.. गझलही तशीच आहे..लाजवाब!
मतला बघा कसा रसरशीत आहे तो,.....एका बहारदार कल्पना-विलासाचा नमुना आहे!