सोपे नसते
Posted by कुमार जावडेकर on Sunday, 26 August 2007सत्य बोलणे सोपे नसते...
सत्य ऐकणे सोपे नसते!
गझल:
पुसतात जात हे मुडदे मसणात एकमेकांना
कोणीच विचारत नाही-- "माणूस कोणता मेला?"
गझल
सत्य बोलणे सोपे नसते...
सत्य ऐकणे सोपे नसते!
आहे उसंत कोठे आता बसायला
आयुष्य लागले हे मजला पिसायला
कसे तुझे रे इमान मित्रा...!
बघून सारे गुमान मित्रा...!
सांगती सत्य ते पानावरती शब्द
आणती स्वतःला भानावरती शब्द
हरवले आहे कधीचे भान माझे
चालले आहे तरी पण छान माझे!...
'कसे जगावे ...?..' प्रश्न एवढा खटकत राही
शरीर माझे, आत्मा माझा झटकत राही
...आता नको !