शब्द


सांगती सत्य ते पानावरती शब्द
आणती स्वतःला भानावरती शब्द


एवढ्याचसाठी चाले पुरता हट्ट
येवु दे सखीचा कानावरती शब्द


दाबले स्वरांना वाटे मज अंतस्थ...
काढती तरीही माना वरती शब्द


घेवुनी भरार्‍या धावे आशय ज्यांचा,
लिहितात काय ते यानावरती शब्द...?


डोलते कुणाच्या शब्दासरशी मुग्ध..!
...उमटला कुणाचा रानावरती शब्द...!


- प्रा. डॉ. संतोष कुलकर्णी, उदगीर


गझल: 

प्रतिसाद

दाबले स्वरांना वाटे मज अंतस्थ...
काढती तरीही माना वरती शब्दघेवुनी भरार्‍या धावे आशय ज्यांचा,
लिहितात काय ते यानावरती शब्द...?

वाव्वा. दोन्ही शेर फार आवडले. शब्दांनी मान वर काढणे खासच. यानावरती शब्द लिहिणेही वेगळे.
पुढील लेखनाला शुभेच्छा.

चित्तरंजन

प्रतिसाद वाचला. धन्यवाद. 'अस्वस्थ' बद्दलचाही  प्रतिसाद वाचला. 'अस्वस्थ' च्या खाली एक भूमिका लिहिली आहे. आपले काय मत आहे, तेही अवश्य कळवावे. यासंबंधी चर्चा आवश्यक वाटते.
प्रा. डॉ . संतोष कुलकर्णी, चैत्रबन , श्याम सोसायटी, येरमेनगरजवळ, उदगीर जि. लातूर ४१३ ५१७ दूरभाष : ०२३८५-२५८०४६ (नि) २५८७५६ (का) भ्रमणध्वनी ९४२२६५७८५०

दाबले स्वरांना वाटे मज अंतस्थ...
काढती तरीही माना वरती शब्द  (वा...वा...छान. दुसरी ओळ आवडली. )
डोलते कुणाच्या शब्दासरशी मुग्ध..!
...उमटला कुणाचा रानावरती शब्द...!  (चित्रमय शेर )
 
 

मनापासून धन्यवाद.
प्रा. डॉ . संतोष कुलकर्णी, चैत्रबन , श्याम सोसायटी, येरमेनगरजवळ, उदगीर जि. लातूर ४१३ ५१७ दूरभाष : ०२३८५-२५८०४६ (नि) २५८७५६ (का) भ्रमणध्वनी ९४२२६५७८५०