ध्वस्त झालो गाव सांगे पूर जेव्हा ओसरे
Posted by कैलास गांधी on Saturday, 17 July 2010प्रश्न हि नव्हते समर्पक उथळ होती उत्तरे
सारखे वाटायचे कि हे खरे कि ते खरे
परतण्याच्या पायवाटा प्राक्तनाने खोडल्या
ठेवली चित्रात शिल्लक जीर्ण झालेली घरे
लोकशाहीवर असाही सूड त्यांनी घेतला