श्वास
Posted by प्रसाद लिमये on Tuesday, 13 July 2010कोणते श्वास श्वासांसवे जागले ?
जाग आली तुझे भास रेंगाळले
भेटण्याला नसावीतही कारणे
पण सुचावेत काही बहाणे भले
ही मिठी ओळखे शब्द अस्पष्टसे
ओळखावे कसे श्वास आपापले ?
'नाव' हे त्या तुझ्या दिवाण्याचे
( काळजी घे जरा उखाण्याची )
कोणते श्वास श्वासांसवे जागले ?
जाग आली तुझे भास रेंगाळले
भेटण्याला नसावीतही कारणे
पण सुचावेत काही बहाणे भले
ही मिठी ओळखे शब्द अस्पष्टसे
ओळखावे कसे श्वास आपापले ?
तुम्ही बोलता, नशेत होतो मी !
खरेच सांगू..?..मजेत होतो मी !
कुणीच नव्हता प्रकाश देणारा?
कश्या दिव्यांच्या सभेत होतो मी?
कुणीही यावे, घरास फोडावे!
कधीच नाही!.. सचेत होतो मी!
दोस्ता तुझी सार्यांबरोबर फार यारी वाटते
तू वेगळे अन वागले की मग गद्दारी वाटते
इतकी सवय जडली मनाला कुंपणी राहायची
ओलांडले हे घर जरा की हद्दपारी वाटते
जुने पेच ते पेश होती नव्याने..
पुन्हा खालती पाहिले त्या दिव्याने!
विसंबू नको, ना दिव्यांचा भरवसा..
दिलासा दिला हा, मला काजव्याने!
असे मृत्यूचा शाप ह्या मीलनाला...
सत्ते तुझ्या चवीने
सत्ते तुझ्या चवीने नेते चळून गेले
कुरवाळती कुणाला, कोणा छळून गेले
सारे मिळून भेदू, हा व्यूह ते म्हणाले
लढतोय एकटाची, सारे पळून गेले
जाणिवा विसरून गेलो चूक झाली
मी तुला माझा म्हणालो, चूक झाली
राज्य चाले जे तहांच्या बोलण्यांवर
मी तिथे लढण्यास आलो, चूक झाली
पाहिजे होते जया हुजरेच सारे
मी तया शिरजोर झालो, चूक झाली?
आज श्वास मी मोकळा भरणार आहे
मुक्त वाट डोळ्यांतुनी करणार आहे
मागची लढाई जरी बिनधास्त होती
आज मी युद्धाचा बळी ठरणार आहे
आसवांतुनी लाभले मज थेंब काही
का दुष्काळ याने तरी सरणार आहे ?
'' बरे दिसत नाही ''
गुडघ्यावरती तुझे रांगणे ,बरे दिसत नाही
पुन्हा पुन्हा हे तुला सांगणे,बरे दिसत नाही
'' 'गझल' न्यायची पुढे'' तू हे खुंटीला बांधून घे
स्वता त्याच खुंटिस टांगणे,बरे दिसत नाही