बोचरे वारे
Posted by विजय दि. पाटील on Wednesday, 19 March 2014बेबंद फुलताना नवी कलमे इथे
धरतील कुठवर तग जुनी झाडे इथे
कुठल्याच साच्यातून मी घडलो कुठे
काहीच नाही व्हायचे माझे इथे
कपड्यांकडे पाहून हळहळतोस का
व्यक्तीत्व बघ उसवून गेलेले इथे
तू ये तुझी इच्छा कधी झालीच तर
आहे सुरू हा याग नेमाने इथे
आल्हाद नाही देत ही झुळझुळ हवा
धाडा जरासे बोचरे वारे इथे