पहा ग़ालिब काय म्हणतो
Posted by विश्वस्त on Wednesday, 14 March 2012"पहा ग़ालिब काय म्हणतो," असे म्हणत समीक्षकसाहेबांनी हा शेर ऐकवला --
बक़द्रे शौक़़ नहीं ज़र्फ़े-तंगनाए-ग़ज़ल
कुछ और चाहिए वुस्अत मेरे बयाँ के लिए
इतकेच मला जातांना सरणावर कळले होते
मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते
"पहा ग़ालिब काय म्हणतो," असे म्हणत समीक्षकसाहेबांनी हा शेर ऐकवला --
बक़द्रे शौक़़ नहीं ज़र्फ़े-तंगनाए-ग़ज़ल
कुछ और चाहिए वुस्अत मेरे बयाँ के लिए
इथे प्रत्येक जण धुंदीत आहे फरक कळल्यास इतकासाच कळतो
कुणाला लागते दारू इथे तर कुणी शुद्धीतही कोरा बरळतो
रिकामा वेळ नसतो फारसा पण तरीही वेळ आम्ही काढतो अन्
मित्रांनो,
जा हो जा येत नाही मी
भाव कुणा देत नाही मी
ना कळले काय झाले ते
माझ्या कवेत नाही मी
गैरसमज आज नाही ते
भलत्याच नशेत नाही मी
माझे मी भोगत आहे
पुण्य कुना देत नाही मी
पापाकडे खेचलो गेलो काय मी?
आयुष्य ऊगा खुरटले बोन्साय मी ।
सैतान जागाच झाला माझ्यातला
हा मांडला भावनांचा व्यवसाय मी
लाथाडले नेहमी त्यांनी ते मला
त्या पायरीशी कसे नेले पाय मी?
कशास त्याची वाट पहावी, जे घडणे आहेच असंभव
उत्तर बदलत नाही, तरिही, करते मन आशाळू आर्जव
या काठावर जसे पोचलो, त्यांच्यासाठी परके झालो
मुठीत अजुनी धरले आहे पैलतिराचे साखर-शैशव
बत्तीस तारखेला
भलत्याच ऐनवेळी, हटकून तोल गेला
नादान सद्गुणांनी अवसानघात केला
जागून रात्र सारी, उपयोग काय झाला?
सावज रणात येता, कुत्रा पळून गेला
हुंदका ओठातला पोटात नाही
प्रेम व्यवहारातले, सत्यात नाही
मोजता खोली विचारांची कळाले
बोलतो नुसतेच, आचारात नाही
हिरकणीइतकीच फरपट रोज होते..
फक्त अमुचा लेख अभ्यासात नाही