एकपात्री
Posted by दशरथ दोरके on Sunday, 2 March 2008ते कधी येणार नव्हते ही मला होतीच खात्री
मी सुरू केला अखेरी खेळ माझा एकपात्री
ठेवतो आहे स्वतःच्या जो घराचे नाव 'आई'
भोगले दारिद्र्य त्याची आश्रमला जन्मदात्री
आजही लोकात जेथे जात धर्माहून भांडण,
गाव ते बघुनी परतला फक्त वेशीतून यात्री
त्याच संस्था फक्त येथे सारख्या वादात दिसती,
लावती उद्घाटनाला हे जिथे नेतेच कात्री
चांदणे खांदेकरी अन् लाजरी पडद्यात स्वप्ने,
ही अशी येते निजेची पालखी दररोज रात्री
दशरथ नामदेव दोरके
सर्वे नं. ८, यशवंतनगर
येरवडा, पुणे ६
भ्रमणध्वनी ९३७११६९९७३