भटांवरचे लेखन

भटांवरचे लेखन

भटसाहेबांच्या सहवासात...

''हे बघा, कुर्कल्णी...प्रदीप ना तुमचं नाव? आता मी जे सांगतोय ते काळजीपूर्वक ऐका. नाव व्हावं म्हणून कधीही लिहू नये. लिहिल्याशिवाय राहवत नाही म्हणून लिहावं. ('कधीही' हा शब्द उच्चारताना उजव्या हाताची तर्जनी त्यांनी मूठ स्थिर ठेवत अशा काही आग्रही पद्धतीनं हलवली, की तो मुद्दा माझ्या मनात त्या मुठीसारखाच स्थिर झाला. पुन्हा "राहवत नाही' हे शब्द ठाशीवपणे उच्चारल्यानंतर 'म्हणून' शब्द उच्चारताना तीच तर्जनी त्यांनी जमिनीच्या दिशेनं अशा वेगानं नेली, की तोही मुद्दा माझ्या मनावर खोलवर परिणाम करून गेला). नाव व्हावं म्हणून लिहिणारेही असतात; पण ते चमकतात, चमकतात आणि विझून जातात. गझल मनापासून आवडली, तरच तिच्या वाटेला जा. गझल मनापासून आवडत नसेल आणि नावासाठी तिच्याकडं वळला असाल, तर ही वाट सोडून आत्ताच वेगळी वाट धरा. आणखी एक सूत्र लक्षात ठेवा. साधना-सिद्धी-प्रसिद्धी. आधी साधना...मग साहजिकच सिद्धी...आणि सिद्धीनंतर आपोआपच प्रसिद्धी. प्रसिद्धीसाठी वेगळं असं काहीच करावं लागत नाही.''

भटसाहेब ३

मला आठवतंय, भटसाहेब त्या काळात `मेनका` या मासिकात गझलिस्तान हे नवगझलकारांच्या गझलांचे सदर मोठ्या हिरीरीने चालवीत असत. ती त्यांची एक गझलविषयक लढाईच होती म्हणा ना ! मराठी गझल हे भटसाहेबांचे जीवितध्येय होते. त्यांच्या डोक्यात, मनात गझलेशिवाय दुसरा विचारच बहुधा नसे. अस्सल, खरीखुरी मराठी गझल मराठी मातीत रुजावी, यासाठी त्यांनी हाती घेतलेल्या व्यापक मोहिमेचाच तो एक भाग होता. त्याच काळाच्या आसपास थोर नाट्यसमीक्षक दिवंगत माधव मनोहर यांनी गझलेच्या संदर्भात लिहिलेल्या एका लेखात उल्लेख केला होता की, गझल हा एक अधम काव्यप्रकार आहे. आता हे विधान काही सोम्यागोम्या समीक्षकाने केलेले नव्हते.

'मग माझा जीव'ची आठवण

त्या काळात मी बांद्र्याला साहित्य सहवासमध्ये राहत होतो. दिनकर साक्रीकरांचा धाकटा आर्किटेक्ट मुलगा राजू खास दोस्त बनला होता. रात्री पायर्‍यांवर गप्पा मारत बसलो असताना मी सहज त्याला माझा कवितेचा चाललेला शोध सांगितला. काही क्षणात तो एकदम म्हणाला, "तू नेहमी दोनच ओळी गुणगुणत असतोस, त्या सुरेश भटांच्याच आहेत ना? मग माझा जीव... असे काहीतरी शब्द आहेत बघ." मी चमकून विचारलं, "मी आपला चाळा म्हणून ते गुणगुणत असतो. काव्यगायनासारखं. पण ती तुला चांगली चाल वाटते?" तो गोंधळून म्हणाला, "का? ती छानच चाल आहे की!" असा अगदी अकल्पितपणे माझा कवितेचा शोध संपला.

Taxonomy upgrade extras: 

दोन विडिओ

असेच एकदा इंटरनेटवर वर शोध घेता मला कविवर्य भटांचे पुढील दोन विडिओ सापडलेत. हे विडिओ या संकेतस्थळावर असावेत असे वाटले, म्हणून पाठवीत आहे. खालील दुव्यांवर टिचकी देऊन विडिओ पाहावेत.

Taxonomy upgrade extras: 

Pages