दिवाळी अंक २००८

भटसाहेब ३

मला आठवतंय, भटसाहेब त्या काळात `मेनका` या मासिकात गझलिस्तान हे नवगझलकारांच्या गझलांचे सदर मोठ्या हिरीरीने चालवीत असत. ती त्यांची एक गझलविषयक लढाईच होती म्हणा ना ! मराठी गझल हे भटसाहेबांचे जीवितध्येय होते. त्यांच्या डोक्यात, मनात गझलेशिवाय दुसरा विचारच बहुधा नसे. अस्सल, खरीखुरी मराठी गझल मराठी मातीत रुजावी, यासाठी त्यांनी हाती घेतलेल्या व्यापक मोहिमेचाच तो एक भाग होता. त्याच काळाच्या आसपास थोर नाट्यसमीक्षक दिवंगत माधव मनोहर यांनी गझलेच्या संदर्भात लिहिलेल्या एका लेखात उल्लेख केला होता की, गझल हा एक अधम काव्यप्रकार आहे. आता हे विधान काही सोम्यागोम्या समीक्षकाने केलेले नव्हते.

Pages