काही वेळा...
नकळत माझ्या माझे चुकते, काही वेळा
खूप उशीरा चूक समजते, काही वेळा...
बघता-बघता गढूळ होते पाणी इथले;
सावकाश मग तेच निवळते, काही वेळा...
चांदण्यात मी रात्र जागतो नेहमीच, पण
चंद्राविण मग रात न ढळते, काही वेळा...
फूल कधी प्रत्येक कळीचे होते का हो?
एखादी पण आतुर असते, काही वेळा...
जीवन मी माझ्या वाटेने चालत असतो
मधेच नियती डाव साधते, काही वेळा...
नाव-गाव अन पत्ता माझा मीच विसरतो;
'अजब' स्वतःशी ओळख निघते, काही वेळा...
-- अजब
Taxonomy upgrade extras:
प्रतिसाद
पुलस्ति
गुरु, 06/11/2008 - 17:52
Permalink
छान
निवळते आणि मक्त्याचा शेर आवडले!!
प्रदीप कुलकर्णी
गुरु, 20/11/2008 - 23:27
Permalink
सुंदर...
नकळत माझ्या माझे चुकते, काही वेळा
खूप उशीरा चूक समजते, काही वेळा...
सुंदर...
बघता-बघता गढूळ होते पाणी इथले;
सावकाश मग तेच निवळते, काही वेळा...
वा...वा...
फार फार आवडले हे दोन शेर