सुरुवात



एवढे रंगू नये स्वप्नात कोणी
फारसे गुंतू नये कोणात कोणी

काय होता आपला संबंध आधी ?
निर्मिले नाते तुझ्यामाझ्यात कोणी ?

हेलकावे रोज या प्राणास बसती
सांग, भरली वादळे श्वासात कोणी ?

दिवस हे कोणामुळे बहरून गेले ?
आणि स्वप्नांनी सजवली रात कोणी ?

खेळ प्रीतीचा सुरू झाला मनोहर
सांग, केली नेमकी सुरुवात कोणी ?

-- केदार पाटणकर

प्रतिसाद

केदार,
छान गझल आहे.

वा केदार वा! अप्रतिम गझल! शेवटी अपेक्षा पूर्ण झाल्याच ! ज्या तुझ्यासारख्या गझलकाराकडून ठेवल्या जातात त्या.
वा. 'सांग केली नेमकी सुरुवात कोणी? ' सुंदर शेर आहे. शुभेच्छा!
 

काय होता आपला संबंध आधी ?
निर्मिले नाते तुझ्यामाझ्यात कोणी ?
 व्वा !


काय होता आपला संबंध आधी ?
निर्मिले नाते तुझ्यामाझ्यात कोणी ?
सुंदर...

दिवस हे कोणामुळे बहरून गेले ?
आणि स्वप्नांनी सजवली रात कोणी ?
वा...वा...वा... खूपच छान.

खेळ प्रीतीचा सुरू झाला मनोहर
सांग, केली नेमकी सुरुवात कोणी ?

वा...वा...

धन्यवाद सर्वांना.