भटांवरचे लेखन

भटांवरचे लेखन

आयुष्य तारण राहिले...

' सुरेश भट ' या दोन शब्दांत काय काय साठवलं होतं. ती भाववृत्ती , ती बेपर्वाई , ती तंद्री , ती मराठी गझलची खांद्यावर घेतलेली पताका , ते मराठी भाषेच्या अणूरेणूवरचं प्रेम , ती कवितेची तगमग , ती धुंदी , ते मैफली गाजवणं , ती बेहोषी , तो कैफ आणि एक बेछूटपणासुद्धा...

Taxonomy upgrade extras: 

सुरेश - राम शेवाळकर

सुरेशच्या धसमुसळ्या व आडदांड व्यक्तिमत्त्वाचा हा कोवळा पैलू मला अपरिचित होता. .या कवितेने सुरेशचे आणि माझे गोत्र जुळले. करुणेने आणि प्रायश्चित्ताच्या भावनेने सुरू झालेली आमची मैत्री कवितेमुळे अधिक सांर्द्र झाली."

Taxonomy upgrade extras: 

विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही

भटांच्या निवडक उत्तमोत्तम गझलांपैकी 'आम्ही' ही एक आहे. तिच्यातील आशय
मनावर आदळताना ठिणग्या उडतात. गझल असल्यामुळे तिची बांधणी कमालीची रेखीव;
पण बांधणी वाटू नये एवढा सहज-स्वाभाविक आविष्कार.

Taxonomy upgrade extras: 

रंग माझा वेगळा - लता मंगेशकर ह्यांचे पत्र

जमीन म्हणजे रदीफ आणि काफिया ह्यांची अशी काही चपखल सांगड की ज्याने गझलचा एक विशिष्ट मूड तयार होतो. तो मूड गझलभर पसरतो. आणि गझल वाचकांच्या , रसिकांच्या मनात घर करते.

Taxonomy upgrade extras: 

रंग माझा वेगळा प्रास्ताविक -पु. ल. देशपांडे

भटांच्या निवडक उत्तमोत्तम गझलांपैकी 'आम्ही' ही एक आहे. तिच्यातील आशय
मनावर आदळताना ठिणग्या उडतात. गझल असल्यामुळे तिची बांधणी कमालीची रेखीव;
पण बांधणी वाटू नये एवढा सहज-स्वाभाविक आविष्कार.

Taxonomy upgrade extras: 

मराठी गझलांचे चैतन्य


दुआ करो, मेरी खुश्बू पे तबसिरा न करो
कि एक रात में खिलना भी था, बिखरना भी
- कैसर-उल-जाफ़री

हरफनमौला सुरेश

गाण्याचा गळा व गाण्यात रुची या गोष्टी सुरेशमध्ये आहेत; हे आमच्या आईच्या (ती. कै. शांताबाई भट) ध्यानात आले. म्हणून सुरेशच्या गाण्यातील रुची वाढावी, काही माहिती व्हावी यासाठी तिने एक बाजाची पेटी (विश्वास कंपनी, कोलकाता) आणली आणि त्याला संगीताची मुळाक्षरे व बाराखडी शिकविणे सुरू केले. आमची आई ही स्वत: चांगली पेटी वाजवायची व तिला संगीताची जाण होती. पुढे काही वर्षांनंतर सुरेशला पद्धतशीर गाणे शिकविण्यासाठी प्रल्हादबुआ नावाचे संगीत शिक्षक आमच्या घरी येत असत. त्याची गाण्याची आवड व प्रगती पाहून आमच्या वडिलांनी (ती. कै. डॉ. श्री. रं. भट) एच. एम. व्ही.चा एक ग्रामोफोन (चावीवाला) आणला होता.

सुरेश भटांच्या त्या दोन ओळी...

sureshbhat.in या संकेतस्थळावर मला जवळपास दोन वर्षें होतील. सुरेश भट आणि त्यांच्यासंबंधी बर्‍याच गोष्टी वाचायला - अभ्यासायला मिळाल्या. केवळ रदिफ-काफिया घेऊन गझल करता येत नाही. त्यातील बाह्यतंत्र आणि आंतरिक तंत्र या दोनही गोष्टींवर चर्चा ऐकायला/वाचायला आणि अर्थातच करायला मिळाल्या. सुरेश भटांचे काव्य हे गझलकारांना एक प्रेरणास्त्रोत असते हे अनुभवायला मिळाले. गझल कशी करावी या बरोबरच त्यातील भाव कसा उलगडावा हेही शिकायला मिळाले. तसे, शिकविणारे अनेक भेटले पण इथे मिळाले ते भावले.

Pages