विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही

"भटांच्या निवडक उत्तमोत्तम गझलांपैकी 'आम्ही' ही एक आहे. तिच्यातील आशय
मनावर आदळताना ठिणग्या उडतात. गझल असल्यामुळे तिची बांधणी कमालीची रेखीव;
पण बांधणी वाटू नये एवढा सहज-स्वाभाविक आविष्कार. विरोधन्यासाचा
परिणामकारक वापर. या सर्व विशेषांमुळे रसिकांच्या मनाचा ती सहज कब्जा घेते."

मराठीतील ज्येष्ठ कवी आणि समीक्षक पुरुषोत्तम पाटील ह्यांनी सुरेश भटांच्या गाजलेल्या  'आम्ही' गझलेचे केलेले रसग्रहण दोन भागात सादर आहे.

Taxonomy upgrade extras: