सुरेश भटांच्या गझलांमधील तरल भावकाव्य
Posted by सदानंद डबीर on Wednesday, 19 August 2009'कविता ही बहुरुपिणी आहे' हे वाक्य 'कुसुमाकर' सारख्या कवितांना प्राधान्य देणा-या मासिकाच्या वाचकांना, सांगण्याची गरज नाही; तरी सुद्धा लिहिले आहे. कविता, गीत, लावणी, पोवाडा, अभंग, ओवी (अगदी आरती सुद्धा) कवितेचीच रूपे आहेत. त्यातलेच एक रूप, एक आकृतिबंध (फॉर्म) म्हणजे गझल.