गझलविषयक लेख

शे(अ)रो शायरी, भाग-८ : कभी नेकी भी उसके जी में गर आ जाये है मुझ से

ही गझल लतादीदी आणि आशाताई ह्या दोघींनीही गायली आहे, आणि फार पूर्वी विविध-भारतीच्या रंग-तरंग ह्या कार्यक्रमात लागायची. मतला बघा, असा आहे-
कभी नेकी भी उसके जी में गर आ जाये है मुझ से
जफ़ायें करके अपनी याद शर्मा जाये है मुझ से

शे(अ)रो शायरी, भाग-७ : वो लब कि जैसे सागर-ए-सहबा दिखाई दे

शे(अ)रो शायरीच्या ह्या ७व्या भागात आपण कृष्णबिहारी नूर ह्यांच्या एका, अतिशय रोमॅंटीक मतला असलेल्या, गझलेचा आस्वाद घेणार आहोत. ही गझल मी पहिल्यांदा नेटवर, दुबईला झालेल्या एका मुशायऱ्याच्या ऑडियो क्लिपमधे ऐकली, तेथे तिला श्रोत्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता.. गझलही तशीच आहे..लाजवाब!
मतला बघा कसा रसरशीत आहे तो,.....एका बहारदार कल्पना-विलासाचा नमुना आहे!

शे(अ)रो शायरी, भाग-६ : तफरीह का सामान किया जाये

नमस्कार मित्रांनो,
शे(अ)रो-शायरी ह्या लेखमालेच्या ६व्या भागात आपण सुप्रसिद्ध शायर कतील शिफाई ह्यांच्या एका आशयसंपन्न गझलेचा आस्वाद घेणार आहोत.

शे(अ)रो शायरी, भाग-५ : दोस्ती से दुश्मनी शरमाई रहती है

अस्सल भारतीय मातीचा गंध असलेली एका शायराची शायरी अलिकडेच माझ्या वाचण्यात आली. त्या शायराचे नाव आहे, मुनव्वर राणा! त्यांची शायरी समजायला अतिशय सोपी, आणि भारतीय लोकजीवनातील प्रतिमा, दाखले, कल्पना, ह्यांनी अतिशय चित्तवेधक अश्या ढंगाने नटलेली आहे. त्यांच्याच एका, मला आवडलेल्या, एका गझलेची निवड मी ह्या भागासाठी केली आहे.

शे(अ)रो-शायरी, भाग-४ : खिलौने नहीं चलते

नमस्कार मित्रहो,
शे(अ)रो-शायरी ह्या लेखमालेच्या ४थ्या भागात आपले स्वागत करतो. मित्रांनो, जिथे रोमॅंटीसिझम, रम्य कल्पना-विलास हे उर्दू शायरीचे एक मुख्य वैशिष्ठ्य मानल्या गेले आहे, तिथे, सर्वच शेर वास्तव-दर्शी असलेली, शकील जमाली ह्यांची, एक अतिशय दर्जेदार गझल, अलिकडेच माझ्या वाचण्यात आली, आणि तीच गझल, तिच्या ह्या वैशिष्ठ्यामुळेच, मी आपणासोबत शेअर करतोय; गझल समजायला अतिशय सोपी आहे.

मतला असा आहे की-

अब काम दुआओं के सहारे नहीं चलते
चाबी न भरी हो तो खिलौने नहीं चलते

सहज मनापर्यंत पोहोचलेले....

एखादा शेर किंवा गझल आवडण्यासाठी वाचणाऱ्याचं गतायुष्य, अनुभवविश्व, पूर्वग्रह, आकलनक्षमता, शब्दभांडार अशा अनेक चाळण्या पार कराव्या लागतात. अशा वेळी एखादा शेर पटकन मनाला भावतो. कारण माझ्या मते त्यात आपल्याच कल्पनाविश्वाचा अंश असतो. मला या संकेतस्थळावरचे असे बरेच शेर / गझला आवडल्या आहेत. त्यापैकी काही वाचल्यानंतर मला जे वाटले ते मी इथं लिहितो आहे. समीक्षण / रसग्रहण असा कोणताही संदर्भ याला जोडू नये, ही विनंती.

माझ्या काळाचा अनुवाद

माझ्या काळाचा अनुवाद

कोणत्याही चिकित्सेशिवाय समूहमनाला जे पटत आले आहे जे सहजपणे पटत आले आहे अशा विचारांना फाटे फोडणे, चिथावणे, खो घालणे, नाकारणे, गोंजारून गप्प करणे, डिवचून निरुत्तर करणे, त्यांच्याशी फारकत घेणे या तंत्रांनी काही प्रथमदर्शनी धक्कादायक किंवा आश्चर्यकारक पण कालांतराने पटणारी नवीन विचारसंगती सापडत जाते. असे अनवट विचार आपल्याला सानेकरांच्या पुढील प्रभाषितांमध्ये सापडतात:

त्यातुनी येतो उजेडासारखा अंधार आता
या घराला लावली आहेत जी जी तावदाने

खरे तर दार वा-याने...

गझलकार अनिल कांबळे यांच्या एका गझलेचा मतला मला खूप आवडतो.
खरे तर, दार वा-याने जरासे वाजले होते
कितीदा तूच आल्याचे मनाला वाटले होते...

Pages